सोमवार, १२ मार्च, २०१८

‘पीआरसीआय’च्या कोल्हापूर चॅप्टरची

पुण्यातील जागतिक परिषदेत घोषणा



पुणे येथे पब्लीक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या १२व्या ग्लोबल पीआर कॉन्क्लेव्हमध्ये संस्थेच्या कोल्हापूर चॅप्टरची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी पीआरसीआयचे मुख्य प्रवर्तक एम.बी. जयराम व राष्ट्रीय अध्यक्ष बी.एन. कुमार यांचेसमवेत (डावीकडून) कोल्हापूर चॅप्टरचे खजिनदार राजेश शिंदे, सचिव रावसाहेब पुजारी, अध्यक्ष आलोक जत्राटकर आणि पुणे चॅप्टरचे अविनाश गवई.


आलोक जत्राटकर अध्यक्ष; सतीश ठोंबरे उपाध्यक्ष

कोल्हापूर, दि. १२ मार्च: पब्लीक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या (पीआरसीआय) पुणे येथे झालेल्या बाराव्या जागतिक जनसंपर्क परिषदेत कोल्हापूर चॅप्टरच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. चॅप्टरच्या अध्यक्षपदी माजी जिल्हा माहिती अधिकारी (रायगड-अलिबाग) व येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पीआरसीआयची १२वी जागतिक जनसंपर्क परिषद पुण्यात हॉटेल शांताई येथे ९ व १० मार्च रोजी झाली. परिषदेत पीआरसीआयचे मुख्य प्रवर्तक एम.बी. जयराम आणि राष्ट्रीय अध्यक्ष बी.एन. कुमार यांनी कोल्हापूर चॅप्टरच्या कार्यकारिणीची घोषणा केली.
कोल्हापूर चॅप्टरची कार्यकारिणी अशी: अध्यक्ष- आलोक जत्राटकर (जनसंपर्क अधिकारी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), उपाध्यक्ष- सतीश ठोंबरे (वरिष्ठ व्यवस्थापक, समृद्धी समूह, सांगली), खजिनदार- राजेश शिंदे (संचालक, मीडियाटेक, कोल्हापूर), सचिव- रावसाहेब पुजारी (संपादक व प्रकाशक, तेजस प्रकाशन, कोल्हापूर).
पीआरसीआय ही संस्था जनसंपर्क, माध्यम शिक्षण, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, जाहिरात आदी क्षेत्रांत कार्यरत प्रोफेशनल्सची अग्रणी म्हणून राष्ट्रीय पातळीवर पूर्णतः अ-राजकीय व ना-नफा तत्त्वावर कार्यरत आहे. गेल्या बारा वर्षांपासून संस्था जनसंपर्काच्या क्षेत्रात असून देशभरात तीसहून अधिक चॅप्टरच्या माध्यमातून कार्यरत आहे. सन २०१२पासून संवाद व जनसंपर्क अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठीही संस्थेने यंग कम्युनिकेटर्स क्लब (वायसीसी) ही चळवळ चालवली असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कार्यशाळा, सेमिनार व परिषदांच्या माध्यमातून संवाद व माध्यम क्षेत्रातील अद्यावत प्रवाहांशी अवगत करण्यात येते.

२ टिप्पण्या: