सोशल मीडियासंदर्भात सन २०१५मधील १११ मनोरंजक फॅक्ट्स आणि फिगर्स माझ्या ब्लॉग वाचकांसाठी शेअर करीत आहे.
·
फेसबुकच्या
स्थापनेला 11 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही अद्याप या प्लॅटफॉर्मची लोकप्रियता कायम
आहे. तसेच, आघाडी टिकवून आहे. गुगलने गुगल प्लस या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची
निर्मिती करून फेसबुकवर मात करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु गुगल वापरकर्त्यांना
आपोआप सदस्य करवून घेणाऱ्या प्लसला ते शक्य झाले नाही. आता गुगल हँगआऊट व गुगल
फोटोज प्रमाणे प्लसही स्वतंत्र प्लॅटफॉर्म करून वापरकर्ते खेचण्याचा गुगलचा
प्रयत्न सुरू आहे.
·
फेसबुकनं
3 अब्ज डॉलरला स्नॅपचॅट हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खरेदी करण्याचा प्रयत्न केला,
तो फसला. पण, नंतर 20 अब्ज डॉलरमध्ये वॉट्सॲप खरेदी केलं आणि इन्स्टंट चॅट,
शेअरिंग समाजमाध्यमांवरही आपलं प्रभुत्व प्रस्थापित केलं.
·
जगाची लोकसंख्या 7.2 अब्ज इतकी आहे.
त्यापैकी सुमारे 3 अब्ज म्हणजे जवळजवळ 45 टक्के लोक इंटरनेट वापरतात. त्यातल्या
2.1 अब्ज लोकांचं कोणत्या ना कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट आहे.
त्यातलेही 1.7 अब्ज हे सक्रिय वापरकर्ते आहेत. एकूण वापरकर्त्यांमधील 3.65 अब्ज
लोक स्मार्टफोन वा टॅबलेट्सवरून इंटरनेट ॲक्सेस करतात.
·
इंग्रजीव्यतिरिक्त अन्य भाषेतील
क्यू-झोन यासारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मची लोकप्रियता चीन, रशियामध्ये इतकी
मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, तिथे त्यांनी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि गुगल
प्लसलाही मागे टाकले आहे.
·
विकसनशील राष्ट्रांत फिक्स्ड इंटरनेट
कनेक्शन्ससाठी निर्माण करावयाच्या पायाभूत सुविधा महाग असल्याने तिथे वायरलेस
मोबाईल स्मार्टफोन्सनी इंटरनेटच्या वृद्धीसाठी मोठा हातभार लावला आहे. भारतातील
एकूण वेबसाइट ट्रॅफिकपैकी 72 टक्के मोबाईलवरुन ॲक्सेस केले जाते. जगातल्या एकूण
1.65 अब्ज सक्रिय मोबाईल सोशल अकाऊंट्सपैकी 561 दशलक्ष ही केवळ पूर्व आशियात आहेत.
·
जगातल्या एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी
47 टक्के म्हणजे 1.4 अब्ज वापरकर्ते फेसबुकवर आहेत. फेसबुकवर दररोज 4.5 अब्ज
लाइक्स नोंद होतात.
·
फेसबुकच्या एकूण महसुलापैकी 75 टक्के
महसूल हा निव्वळ मोबाईल ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून प्राप्त होतो.
·
फेसबुकवर थेट अपलोड होणाऱ्या व्हिडिओजची
संख्या ही युट्यूबवर अपलोड होणाऱ्या व्हिडिओज पेक्षा अधिक आहे.
- ट्विटरवर सुमारे 284 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. त्यापैकी 88 टक्के ट्विटर मोबाईलवरुन वापरतात. दररोज साधारण 500 दशलक्ष ट्विट्स येथे केल्या जातात.
- गुगल प्लसच्या निर्मितीवर गुगलने जवळपास अर्धा अब्ज डॉलर खर्च केले. त्या प्रमाणात त्याला यश आले नाही. गुगल प्लसचे 363 दशलक्ष वापरकर्ते आहेत. गुगलवरील +1 हे बटण दिवसातून 5 अब्ज वेळा हिट केले जाते.
- इन्स्टाग्रॅम हे फेसबुकच्याच मालकीचे आहे. त्याचे 300 दशलक्ष वापरकर्ते आहेत. त्यावरून दररोज 70 दशलक्ष फोटो व व्हिडीओज पाठविले जातात. 18 ते 29 वयोगटातील 53 टक्के इंटरनेट वापरकर्ते इन्स्टाग्राम वापरतात.
- पिंटरेस्ट हे महिला वर्गात लोकप्रिय आहे. पिंटरेस्टच्या वापरकर्त्यांत 80 टक्के महिला आहेत. सुमारे 70 दशलक्ष वापरकर्ते पिंटरेस्ट वापरतात. पिन केलेले उत्पादन घेण्याचे प्रमाण 88 टक्के इतके मोठे आहे.
- प्रोफेशनल सोशल नेटवर्क म्हणून सन 2002पासून लिंक्डइनने आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे. लिंक्डइनवर 347 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. एकूण वापरकर्त्यांमधील 39 दशलक्ष हे विद्यार्थी विशेषतः पदवीधर आहेत. सन 2014च्या अखेरीस 643 दशलक्ष डॉलरचा महसूल लिंक्डइनने मिळविला.
- अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये व्हायबरचे 200 दशलक्ष वापरकर्ते आहेत. चीनमध्ये क्यू-झोनचे 639 दशलक्ष वापरकर्ते आहेत. 600 दशलक्ष वॉट्सॲप वापरतात. फेसबुक मेसेंजर 500 दशलक्ष लोक वापरतात. चीनमध्ये वुईचॅटचे 468 दशलक्ष वापरकर्ते आहेत. स्नॅपचॅटचे 100 दशलक्ष वापरकर्ते आहेत.
- सन 2015च्या अखेरपर्यंत सोशल नेटवर्क्स जाहिरातींच्या माध्यमातून 8.3 अब्ज डॉलरची कमाई करतील, असा अंदाज आहे.
- केवळ तीन मिनिटांत युट्यूबवर तीनशे तासांचे व्हिडीओ अपलोड केले जात असतात.
- ट्विटरच्या 44 टक्के वापरकर्त्यांनी एकही ट्विट केलेले नाही.
- 'आय हेट द फेसबुक लाइक बटन डॉट कॉम' यांसारखे फेसबुकच्या विरोधातले कित्येक डोमेन फेसबुकवर आहेत. विरोधालाही सन्मानाचे स्थान देण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे यापेक्षा दुसरे चांगले उदाहरण कोणते असेल?
- इंटरनेटचे 74 टक्के प्रौढ वापरकर्ते सोशल नेटवर्किंग साइट वापरतात.
- विकीपेडिया हे जर छापील पुस्तक असते, तर त्याला दोन अब्जांहून अधिक पाने असती.
- लिंक्डइनच्या ॲक्टीव्ह वापरकर्त्यांचे प्रमाण पिंटरेस्ट, गुगल प्लस, ट्विटर व फेसबुकच्या वापरकर्त्यांपेक्षा कमी आहे.
- ऑनलाइन असणारे वापरकर्ते त्यांच्या दर सात मिनिटांपैकी एक मिनिट फेसबुकवर घालवतात.
- पिंटरेस्टवरील एकूण पिन्सपैकी सुमारे 80 टक्के या प्रत्यक्षात रि-पिन्स असतात.
- रेडिओला 50 दशलक्ष श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यास 38 वर्षे लागली; फेसबुकने मात्र वर्षाच्या आतच 200 दशलक्षांहून अधिक वापरकर्ते जोडले.
- जगातल्या एकूण ग्राहकांपैकी 74 टक्के ग्राहक त्यांच्या खरेदीचा निर्णय सोशल मीडियाच्या प्रभावाखाली घेतात.
- फेसबुक हा जर एक देश असता, तर चीन, भारताखालोखाल तो जगातला तिसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश असता.
- फेसबुकचे वापरकर्ते या सोशल नेटवर्कवर सुमारे 10.5 अब्ज मिनिटे (म्हणजे जवळ जवळ 20 हजार वर्षे) घालवितात. विशेष म्हणजे या आकडेवारीत मोबाईलवरुन फेसबुक वापरणाऱ्यांचा समावेश केलेला नाही.
- टंबलरचे वापरकर्ते दर मिनिटाला अंदाजे 27 हजार 778 नवीन ब्लॉग पोस्ट्स प्रकाशित करत असतात.
- पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या माता सोशल मीडियावर अधिक सक्रिय असल्याचे आढळले आहे.
- जगातल्या प्रत्येक पाच जोडप्यांपैकी एका जोडप्याची भेट ऑनलाइन झालेली असते.
- इन्स्टाग्रामवर दररोज एक अब्ज लाइक्स नोंद होतात.
- सोशल मीडियावर ब्रँडकडून पटकन प्रतिसाद मिळाल्यास त्याची इतरांकडे शिफारस करणाऱ्या वापरकर्त्यांचे प्रमाण 71 टक्के इतके आहे.
- इंटरनेटवर पूर्वी पोर्न पाहणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्याची जागा आता सोशल मीडिया वापरकर्त्यांनी घेतली आहे. इंटरनेटवर आता सोशल मीडिया ॲक्टीव्हीटी प्रथम क्रमांकाची बनली आहे.
- इन्स्टाग्रामने व्हिडिओ शेअरिंगची सुविधा उपलब्ध केल्यानंतर पहिल्या 24 तासांतच इन्स्टाग्राम वापरकर्त्यांनी 5 दशलक्ष व्हिडिओ अपलोड केले.
- एका सर्वेक्षणात सहभागी बहुसंख्य नागरिकांनी फेसबुकवरील जाहिराती फारशा विश्वासार्ह नसल्याचे मत नोंदविले आहे.
- 189 दशलक्ष वापरकर्ते केवळ मोबाईलवर फेसबुक वापरतात.
- लिंक्डइनवर दर सेकंदाला दोन नवे सदस्य जॉइन होतात.
- दरमहा एक अब्जापेक्षा अधिक वापरकर्ते हे युट्यूबला भेट देतात.
- फेसबुकचे वापरकर्ते 500 वर्षांच्या कालावधीइतके व्हिडिओ दररोज पाहतात.
- ऑनलाइन ग्राहकांपैकी 97 टक्के ग्राहक स्थानिक विक्रेत्यांचीच माहिती ऑनलाइन शोधतात.
- केवळ फेसबुकशी निगडित असणारी 10 अब्जांहून अधिक ॲप उपलब्ध आहेत.
- पिंटरेस्टवर सर्वाधिक म्हणजे सुमारे 57 टक्के चर्चा ही खाद्यपदार्थांच्या संदर्भात होत असते.
- फेसबुकवर दर मिनिटाला नवी 500 अकाऊंट तयार होतात.
- लिंक्डइनवर तीन अब्जांहून अधिक कंपन्यांची पेजेस आहेत, तर एक अब्जांहून अधिक एंडॉर्समेंट्स आहेत.
- फेसबुकवर दर मिनिटाला 50 हजार लिंक्स शेअर केल्या जातात.
- फेसबुकवरील लाइक बटन दर मिनिटाला 31 लाख 25 हजार वेळा दाबले जाते.
- जगातल्या पाचपैकी एका घटस्फोटाला सोशल मीडिया कारणीभूत ठरते आहे.
- बिंग आणि याहूपेक्षाही अधिक सर्च क्वेरी आता ट्विटरकडून हाताळल्या जातात.
- दररोज प्रत्येक मिनिटाला फेसबुकवर 6 लाख 84 हजार 478 माहितीचे तुकडे शेअर केले जातात; तर, इन्स्टाग्रामवर 3600 फोटो अपलोड केले जातात आणि फोर-स्क्वेअरवर 2083 लॉग-इन्स नोंद होतात.
- ऑनलाइन ग्राहकांपैकी 90 टक्के मित्र-मैत्रिणी वा सह-वापरकर्त्यांच्या शिफारशींवर विश्वास ठेवतात. जाहिरातींवर केवळ 14 टक्के ग्राहक विश्वास ठेवतात.
- फेसबुकवर दर मिनिटाला सुमारे अडीच लाख फोटो अपलोड होतात, तर दीड लाख संदेशांची देवाण घेवाण होते.
- 'सेल्फी' या शब्दाला आता वेबस्टरच्या डिक्शनरीतही स्थान मिळाले आहे.
- ट्विटरचे वापरकर्ते दररोज 58 दशलक्ष ट्विट्स पाठवितात म्हणजे सेकंदाला जवळ जवळ 9100 इतक्या. तरीही, 222 दशलक्ष वापरकर्ते केवळ इतरांच्या ट्विट्स पाहतात.
- 93 टक्के विक्रेते सोशल मीडियावरुन मार्केटिंग करतात; केवळ 9 टक्के मार्केटिंग कंपन्या पूर्णवेळ ब्लॉगर्स आहेत.
·
जगातल्या
एकूण सोशल मीडिया वापरकर्त्यांपैकी 21 टक्के ट्रॅफिक फेसबुककडे असते. एकूण इंटरनेट
वापरकर्त्यांच्या तुलनेतही हे प्रमाण 23 टक्के आहे.
·
दर
महिन्यात सरासरी 1.28 अब्ज वापरकर्ते फेसबुकवर सक्रिय असतात. ही संख्या भारताच्या
लोकसंख्येएवढी आहे.
·
30
टक्के अमेरिकन लोक आता बातम्या मिळविण्यासाठी फेसबुकचाच अधिक वापर करतात.
·
फेसबुकचे
23 टक्के वापरकर्ते दिवसातून किमान पाच वेळा फेसबुकच्या साइटला भेट देतात.
·
फेसबुकचे केवळ 25 टक्के वापरकर्ते
त्यांची प्रायव्हसी सेटिंग्ज सेट करतात किंवा त्याविषयी दक्ष राहतात.
·
फेसबुकच्या वापरकर्त्यांची प्रत्येकी
सरासरी मित्र संख्या 250 इतकी आहे.
·
77
टक्के बिझनेस, कंपन्यांनी त्यांचे ग्राहक केवळ फेसबुकच्या माध्यमातून मिळविले
आहेत.
·
ट्विटरच्या लोगो व ब्रँडिंगमधील
पक्ष्याचे नाव 'लॅरी' आहे. हे नाव
वर्डस्ट्रीमच्या लॅरी किमवरुन नव्हे, तर बोस्टन सेल्टिक्सचा फॉरवर्ड लॅरी बर्ड
यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे.
·
ट्विटरवर दरमहा अंदाजे 320 दशलक्ष
सक्रिय वापरकर्ते असतात. त्यातील 100 दशलक्ष दररोज सक्रिय असतात.
·
जगातल्या 80 टक्के नेत्यांची ट्विटर
अकाऊंट्स आहेत.
·
दहा
टक्के अमेरिकन्स कामाच्या ठिकाणी ट्विटरचा वापर करतात. 15 टक्के लोक कामाच्या
ठिकाणी ट्विटर ॲक्सेस करू शकत नाहीत. छायाचित्रांसह असलेल्या ट्विट्सना विना-चित्र
ट्विट्सपेक्षा 18 टक्के अधिक क्लिक्स मिळतात.
·
200
दशलक्ष वापरकर्ते असलेल्या इन्स्टाग्रामची सुरवात 6 ऑक्टोबर 2010 रोजी झाली. 21
डिसेंबर 2010पर्यंत वापरकर्त्यांची संख्या 1 दशलक्षांहून अधिक झाली. इतकी वृद्धी
नोंदविण्यासाठी ट्विटरला 2 वर्षे लागली होती.
·
41
दशलक्ष इन्स्टाग्राम फोटोंवर सेल्फी रिलेटेड हॅशटॅग्ज लावले जातात. हे एक तर खूपच
उत्साहवर्धक असतात किंवा अतीव निराशाजनक तरी.
·
न्यूयॉर्क
शहर हे इन्स्टाग्रामवरील सर्वाधिक जिऑ-टॅग्ड शहर आहे, त्या खालोखाल टाइम्स
स्क्वेअरचा क्रमांक लागतो.
·
इन्स्टाग्रामच्या
सुरवातीपासून आजअखेर 16 अब्जांहून अधिक फोटो यावर अपलोड केले गेले आहेत.
·
अंदाजे 32 टक्के अमेरिकन टीनएज
मुलांच्या दृष्टीने इन्स्टाग्राम हे सर्वाधिक महत्त्वाचे सोशल नेटवर्क आहे.
·
चालू वर्षात (2015) इन्स्टाग्रामला
जाहिरातींच्या माध्मयातून 595 दशलक्षांचा महसूल अपेक्षित आहे. हा आकडा सन
2017पर्यंत 2.81 अब्जांच्या घरात जाणे कंपनीला अपेक्षित आहे.
·
पिंटरेस्टचे 100 दशलक्ष सक्रिय
वापरकर्ते आहेत. यात 70 टक्के महिला आहेत. 81 टक्के अमेरिकन महिलांच्या दृष्टीने
बातम्या व माहितीचा हा सर्वाधिक विश्वासार्ह स्रोत आहे.
·
पिंटरेस्टचे 75 टक्के ट्राफिक हे
मोबाईलद्वारेच ॲक्सेस होते. पिंटरेस्टवरुन इ-कॉमर्स साइट्सना जे ग्राहक रेफर केले
जातात, त्यांच्याकडून खरेदीची शक्यता फेसबुकसह अन्य सोशल मीडिया
वापरकर्त्यांपेक्षाही दहा टक्क्यांनी अधिक असते.
·
पिंटरेस्टच्या प्रत्येक क्लिकगणिक
निर्माण होणारा महसूल हा ट्विटरच्या 400 टक्के अधिक तर फेसबुकच्या 27 टक्के अधिक
असतो.
·
एका महिन्यात दहा दशलक्षांहून अधिक
वापरकर्त्यांनी भेट देण्याचा टप्पा पिंटरेस्टने अन्य कोणत्याही वेबसाइटच्या तुलनेत
अत्यंत कमी विक्रमी वेळेत गाठला- अगदी एक वर्षाच्या आतच!
भारताच्या संदर्भात सोशल मीडियाच्या काही मनोरंजक फॅक्ट्स (2015):
·
भारतात फेसबुकचे 125 दशलक्ष
सक्रिय वापरकर्ते आहेत, त्यापैकी 114 दशलक्ष व्यक्ती केवळ मोबाईलवर फेसबुक
वापरतात. यामुळे भारत हा अमेरिकेपाठोपाठ फेसबुक वापरणारा जगातील सर्वात मोठा दुसरा
देश आहे.
·
फेसबुक हा भारतात सर्वाधिक
सक्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. भारतातल्या एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 47
टक्के व्यक्तींचे फेसबुक अकाऊंट आहे.
·
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांचे जवळपास चार कोटींच्या घरात फेसबुक फॉलोअर्स आहेत. तर, अभिनेता जॉन
अब्राहमच्या फेसबुक फॅन पेजेसची संख्या 33 हजारांहून अधिक आहे. बजरंगी भाईजान या
चित्रपटाची फॅन पेजेसही वीस हजारांच्या घरात आहेत.
·
भारतात फेसबुकवर दररोज
साडेचार अब्ज लाइक्स नोंद होतात.
·
फ्लिपकार्टला फेसबुकवर
मिळणारा प्रतिसाद दर 78 टक्क्यांच्या घरात आहे तर प्रतिसाद वेळ हा 131 मिनिटे इतका
आहे.
·
फेसबुकवर थेट व्हिडिओ अपलोड
होण्याचे प्रमाण हे युट्यूब पेक्षा अधिक आहे.
·
कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क
या उत्पादनाच्या 'हॅव यू फेल्ट सिल्क लेटली?' या पोस्टने फेसबुकच्या टॉप पोस्टची पोझिशन
प्राप्त केली आहे.
·
84 लाखांहून अधिक फॅन
फॉलोअर्ससह आजतक हा फेसबुकवरील टॉप मीडिया ब्रँड आहे.
·
जून 2015अखेरीस संपलेल्या तिमाहीमध्ये
फेसबुकला सर्वाधिक म्हणजे 76 टक्के महसूल मोबाईलच्या जाहिरातींमधून मिळाला.
फेसबुकला जगभरात 3.83 अब्ज डॉलरच्या एकूण महसुलापैकी केवळ आशिया पॅसिफिक विभागातून
605 दशलक्ष डॉलरची कमाई झाली.
·
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय
ॲप्समध्ये फेसबुकचा चौथा क्रमांक आहे. वॉट्सॲप पहिल्या स्थानी तर त्याखालोखाल
फ्लिपकार्ट व फेसबुक मेसेंजरचा क्रमांक लागतो.
ट्विटरबाबत:
·
ट्विटरचे जगभरात 316
दशलक्षांहून अधिक वापरकर्ते आहेत, त्यापैकी 77 टक्के वापरकर्ते अमेरिकेबाहेरील
आहेत. भारतातील ट्विटर वापरकर्त्यांची संख्या 40 दशलक्षांहून अधिक आहे.
·
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ
बच्चन यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 1 कोटी 78 लाख इतकी आहे. त्या खालोखाल
अभिनेता शाहरुख खानचे 1 कोटी 62 लाख फॉलोअर्स आहेत. अभिनेता आमीर खानच्या
फॉलोअर्सची संख्या 1 कोटी 53 लाख आहे, तर भारतीय पंतप्रधान कार्यालयाच्या फॉलोअर्सची
संख्या 85 लाख इतकी आहे.
·
भारतातील 76 टक्के
वापरकर्ते दिवसातून एकदा तरी ट्विटरला भेट देतात. 79 टक्के लोक मोबाईलवर ट्विटर
ॲक्सेस करतात. 64 टक्के वापरकर्ते विविध ब्रँड्सना फॉलो करण्यासाठी ट्विटर
वापरतात, 33 टक्के शॉपिंगसाठी व 29 टक्के नवनवीन ब्रँड्स शोधण्यासाठी ट्विटर
वापरतात.
लिंक्डइनबाबत:
·
लिंक्डइनने भारतात 30
दशलक्ष वापरकर्त्यांची संख्या ओलांडली आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी
वापरकर्त्यांची संख्या 50 टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकेपाठोपाठ लिंक्डइन
वापरकर्त्यांची संख्या भारतात सर्वाधिक आहे.
·
भारतात पिंटरेस्ट व
इन्स्टाग्रामपेक्षा लिंक्डइनची लोकप्रियता अधिक आहे. वापरकर्त्यांमध्ये विविध
आघाडीच्या कंपन्या, उद्योगांशी संबंधित संचालक, कार्यकारी संचालक व अन्य
महत्त्वाच्या व्यक्तींची संख्या 10 लाखांहून अधिक आहे.
इन्स्टाग्रामबाबत:
·
इन्स्टाग्रामच्या
वापरकर्त्यांमध्ये पुरूषांचे प्रमाण महिलांच्या तुलनेत अधिक आहे. भारतातील एकूण
महिला इंटरनेट वापरकर्त्यांच्या तुलनेत केवळ एक चतुर्थांश महिला इन्स्टाग्रामवर
आहेत.
·
18 ते 29 वयोगटातील 53
टक्के व्यक्तींची इन्स्टाग्रामवर अकाऊंट्स आहेत.
पिंटरेस्टबाबत:
·
पिंटरेस्टचे जगभरात 70
दशलक्षांहून अधिक वापरकर्ते आहेत; त्यातील 8.19 दशलक्ष वापरकर्ते भारतातील आहेत.
·
'फूड ॲन्ड ड्रिंक' ही कॅटेगरी पिंटरेस्टवर सर्वाधिक पिन आणि
ब्राऊज केली जाते.
·
दररोजच्या सक्रिय पिनर्सचे
सरासरी वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे.
यूट्यूबबाबत:
·
युट्यूबवर ए.आय.बी. आणि टी.व्ही.एफ.चे
दहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.
·
टी-सिरीजचा ऑडियन्स भारतात सर्वाधिक
आहे. चार अब्जांहून अधिक व्ह्यूज टी सिरीजच्या व्हिडिओजना मिळाले आहे. टी सिरीज
चॅनेलच्या पाठोपाठ कलर्स टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या आहे.
·
युट्यूबवरील चित्रपटांचे ट्रेलर किंवा
संपूर्ण चित्रपट शेअर करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
गुगल प्लसबाबत:
·
भारतातील ऑनलाइन वापरकर्त्यांपैकी एकूण
82 टक्के वापरकर्ते गुगल प्लसवर आहेत.
·
प्लस बटन दररोज पाच अब्ज वेळा दाबले
जाते.
मोबाईलसंदर्भातील
सोशल मीडिया फॅक्ट्स:
·
मोबाईलच्या एकूण वापरापैकी
सर्वसाधारणपणे 10 टक्के वापर हा सोशल मीडियासाठी व व्हिडिओ पाहण्यासाठी केला जातो.
त्या पाठोपाठ गेम्स खेळण्यासाठी मोबाईलचा वापर होतो.
·
'पे-टीएम'ने भारतात शंभर दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे,
तर, त्याचवेळी मोबिक्विक मात्र 17 दशलक्षांवरुन वापरकर्त्यांचा आकडा पुढे
वाढविण्यासाठी झगडते आहे.
·
भारतातील 41 टक्के
वापरकर्ते मोबाईलवर ऑनलाइन कन्टेन्ट वाचतात. रात्री साडेदहा वाजता सर्वाधिक मोबाईल
व टॅबलेट युजर्स ऑनलाइन असतात.
·
एका जागतिक
सर्वेक्षणानुसार, भारतातील 29 टक्के मोबाईल बँकिंग ॲप्लीकेशन्स सायबर हल्ल्यांना
बळी पडू शकणारी आहेत.
·
भारतातील इंटरनेट
वापरकर्त्यांची एकूण संख्या सन 2018 पर्यंत 500 दशलक्षांच्या घरात जाण्याची शक्यता
आहे.
सोशल मीडियाशी
निगडित अन्य मुद्दे:
·
भारताच्या ग्रामीण भागातील
सोशल मीडिया वापरकर्त्यांची संख्या गेल्या एका वर्षात शंभर टक्क्यांनी वाढली आहे.
त्यातील 25 दशलक्ष लोक केवळ फेसबुक, ट्विटरवर लॉग-इन होण्यासाठी इंटरनेट वापरतात.
·
'सिमँटेक'च्या सर्वेक्षणानुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वाधिक
सायबर हल्ले होणारा भारत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.
·
या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत
एनडीटीव्हीच्या एकूण महसुलामध्ये 21 टक्के वाटा हा डिजिटल व ई-कॉमर्सचा आहे.
गतवर्षीच्या तुलनेत ही वृद्धी २९ टक्क्यांनी अधिक आहे.
·
७८ टक्के भारतीयांना
त्यांच्या मातृभाषेतील व्हिडिओ पाह्यला अधिक आवडते.
·
भारतात इंटरनेटचा सरासरी
वेग हा २.३ एमबीपीएस इतका आहे. एशिया-पॅसिफिक विभागातील हा दुसऱ्या क्रमांकाचा
सर्वाधिक वाईट वेग आहे. इंडोनेशियातील वेग २.२ एमबीपीएस इतका कमी आहे.
·
सोशल मीडियाचा ८९ टक्के
वापर १८ ते २९ वयोगटातील वापरकर्त्यांकडून केला जातो.
--00--
मस्त, खरच मनोरंजक माहिती आहे.
उत्तर द्याहटवाअनिकेत जी, धन्यवाद!
हटवाkhupch chan mahiti ahe, ji saral ani sopya bhashet mandali ahe.
उत्तर द्याहटवाधन्यवाद गायत्री जी!
हटवा