शुक्रवार, १२ जानेवारी, २०१८

विवेकानंद- आजच्या नजरेतून!




Swami Vivekananda

(स्वामी विवेकानंद यांचा दि. १२ जानेवारी हा जन्मदिन. यानिमित्त आजच्या परिप्रेक्ष्यातून त्यांच्या विचारांचा घेतलेला हा वेध...)

विवेकानंदांची आपल्याला पहिली ओळख होते ती शालेय अभ्यासक्रमात! शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये अन्य धर्मांचे प्रचारक सभ्य स्त्री-पुरूष हो, असे संबोधन वापरीत असताना स्वामी विवेकानंदांनी वापरलेले माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, हे संबोधनच इतके साऱ्यांना भिडले की, पुढची दहा मिनिटे सभागृह टाळ्यांच्या गजरात बुडून गेले. एवढी कथा आपण ऐकतो आणि पुढे तेवढ्याच जोरावर विवेकानंदांचे मोठेपण जोखण्याचा प्रयत्न करतो. पण, या प्रसंगाचे मूळ हेतू आणि महत्त्व मात्र आपण खऱ्या अर्थाने लक्षातच घेत नाही. इंटरनेट अस्तित्वात येऊन आता पंचवीसेक वर्षे होत आली. तेव्हा आपण वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज असे म्हणू लागलो. पण इंटरनेटचा उदय होण्यापूर्वी साधारण दीडशे वर्षांपूर्वी विवेकानंदांनी ग्लोबल ब्रदरहूडचा संदेश शिकागोच्या भाषणाच्या त्या एका संबोधनातून दिला. विवेकानंदांचे हे संबोधन म्हणजे जणू साऱ्या धर्मांच्या शिकवणीचे सार होते. जागतिक बंधुत्ववादाचा हुंकार स्वामी विवेकानंदांनी जागतिक व्यासपीठावरुन भरला आणि भारतीय संस्कृती, परंपरेचे ज्ञान साऱ्या जगाला करवून दिले आणि 1893पासून ते अगदी मृत्यूपर्यंत जागतिक स्तरावर सातत्याने भारतीय परंपरांचे अत्यंत वस्तुनिष्ठ विश्लेषण ते करीत राहिले, तिचे महत्त्व पटवून देत राहिले, आपल्या आरोग्याची पर्वाही न करता. हे विवेकानंदांचे खरे मोठेपण होते.
विवेकानंदांचे एकूणच विचार वाचले असता, त्यात साऱ्याच गोष्टींकडे पाहण्याचा त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन झळाळून सामोरा येतो. विशेषतः फेब्रुवारी 1900मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया इथे दिलेले बुद्धीस्ट इंडिया हे भाषण म्हणजे त्यांच्या भारतीय संस्कृती आणि परंपरेकडे पाहण्याच्या व्यापक वैज्ञानिक दृष्टीकोनाचा परिपाक आहे, असे म्हणावे लागेल.
या भाषणामध्ये हिंदू धर्मातील सनातनवाद, रुढीवाद, जातिभेदांचे अवडंबर या गोष्टींचा विवेकानंदांनी परखड भाषेत समाचार घेतला आहे. या धर्माला लागलेले विभूतीपूजेच्या ग्रहणाविषयीही ते चिंता व्यक्त करतात. आणि या विभूतीपूजेच्या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धाचे माणूस असणे अधोरेखित करतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बुद्धाची स्थितप्रज्ञ व स्थिर राहण्याची क्षमता, त्याची कार्य करण्याची, विरोधकांचाही शांतपणेच प्रतिवाद करण्याचे कौशल्य यांची ते स्तुती करतात. शुद्ध चारित्र्य, पावित्र्य, सद्भाव आणि सर्वांप्रती प्रेमभाव ही बुद्धाची शिकवण जगामध्ये शांती व सद्भावनेच्या प्रस्थापनेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे ते सांगतात.  अगदी अखेरच्या क्षणीही आपल्या शिष्यांना माझ्या जाण्याने शोक करू नका. मी तुमच्यापैकीच एक होतो, तुमच्यातून नाहीसा झालो, इतकाच आपल्या नसण्याचा अर्थ घेऊन धम्मकार्य पुढे चालविण्याचा उपदेश देणाऱ्या बुद्धाचे माणसातील माणूस असणे त्यांना इतर धर्म संस्थापकांपासून वेगळे करते, हेच बुद्धाचे वैशिष्ट्य आपल्याला अधिक भावते, असे विवेकानंद निःसंदिग्धपणे सांगतात. असे असले तरी, हिंदू धर्मातील वेदांतच आपल्याला अधिक विचारप्रवण करतो आणि म्हणून अधिक जवळचा वाटतो, असेही सांगून ते स्वतःची विचारधारा स्पष्ट करतात.
विवेकानंदांना अभिप्रेत असणारा वेदांत म्हणजे केवळ महाप्रचंड असा वेदांचा संग्रह नव्हे; तर, त्यांच्या ठायी उपलब्ध असणारे ज्ञान होय. हे ज्ञान  निसर्गाच्या विविध प्रेरणांपासून प्राप्त झालेले आहे. या नैसर्गिक प्रेरणांचे ज्ञान म्हणजे वेदांत होय. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांना दैवतांचे स्वरुप दिले. त्यांच्याप्रती टोकाचा विभूती पूजाभाव बाळगणे अथवा त्यांना पूर्णतः नाकारणे, या दोन्ही गोष्टी अयोग्यच आहेत. या दोहोंमधील मध्यममार्ग म्हणजे अध्यात्म आहे. अधि+आत्म. कोणालाही जग समजून घ्यायचे असेल, तर त्याने आधी स्वतःला समजून घ्यायला हवे, तरच त्याला जगाचे खरे ज्ञान होईल, हेच अध्यात्माला अभिप्रेत आहे. भगवान बुद्धही त्यापेक्षा वेगळे काही सांगत नाहीत. अत्त दीप भवः. स्वयंप्रकाशित व्हा, असा संदेश देणाऱ्या बुद्धाचा संदेश आणि विवेकानंदांचा संदेश हे दोन्ही अखिल मानवजातीच्या कल्याणासाठीचेच आहेत.
मूल्याधिष्ठित मानवतावादाच्या प्रेरणा विवेकानंदांच्या विचारांत आहेत. आधुनिक काळाच्या अनुषंगाने आपण त्यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन जाणून घ्यायचा, तर त्यासाठी आपल्याला त्यांचा शिक्षणविषयक दृष्टीकोन जाणून घेतल्याखेरीज पुढे जाता येणार नाही, इतके त्या विचारांचे महत्त्व आहे.
मनुष्यत्व निर्माण करणे आणि त्या माध्यमातून त्याच्यात शहाणपणा विकसित करणे, हेच शिक्षणाचे प्रमुख कार्य आहे, असे विवेकानंद मानतात. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी जे पूर्णत्व आधीचेच विद्यमान आहे, त्याचे प्रकटीकरण असते’, हा त्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन होता. कोणतेही ज्ञान बाहेरून येत नाही. ज्ञानाचा प्रचंड साठा घेऊनच माणूस जन्माला येतो. आत्मा म्हणजे अनंत ज्ञानाची खाण आहे आणि शिकणे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून आत्म्यावरील आवरण बाजूला सारणे होय. आत्म्यावरील हे आवरण दूर सारले जाते, म्हणजेच माणसाला ज्ञान होते, तो शिकतो, असा विचार ते मांडतात. ज्या माणसाच्या बाबतीत हे आवरण जास्त दूर होते, तो अधिक ज्ञानी. ज्या माणसाच्या बाबतीत हे आवरण दाट, तो अज्ञानी आणि ज्या माणसाच्या बाबतीत हे आवरण पूर्णपणे दूर होते, तो सर्वज्ञानी! थोडक्यात सत्याकडून सत्याकडे असाच ज्ञानाचा अखंड प्रवास सुरू असतो. अल्पज्ञात सत्याकडून अधिक ज्ञात सत्याकडे आणि पुन्हा अधिक व्यापक सत्याकडे, असा ज्ञानाचा प्रवाह असतो, असे ते म्हणतात. सर्वसामान्यांना समजू शकणाऱ्या अत्यंत साध्या, सोप्या व सरळ भाषेत या विचारांचे स्पष्टीकरण ते करतात.
आजपर्यंत या जगात कुणीही, कुणाला शिकवलेले नाही. प्रत्येकजण स्वत:चा गुरू होऊन, स्वत:च शिकत असतो. एखादे रोपटे जसे स्वत:च, स्वाभाविकरित्या वाढते, तसेच मूलसुद्धा स्वत:च स्वाभाविकरित्या शिकते. आपण पालक, शिक्षक त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत फक्त्त मदत करू शकतो. आत वसत असलेल्या ज्ञानाला जागे करण्याचे आणि त्याच्या शिकण्याच्या मार्गातील अडचणी दूर करण्याचे काम पालकांनी, शिक्षकांनी करायचे असते. हात, पाय, नाक, कान, डोळे, जीभ, त्वचा या विविध इंद्रियांचा शिकण्यासाठी योग्यरित्या उपयोग करण्याचे शिक्षण तेवढे आपण द्यायचे असते. आईवडिलांनी अवास्तव अधिकार गाजवल्यामुळे मुलांच्या स्वतंत्र वाढीला वाव मिळत नाही. सिंह होण्याच्या एखाद्याच्या मार्गात आपण जर धोंड आणली तर तो कोल्हा मात्र होईल, असा अत्यंत स्वच्छ आणि व्यवहार्य सल्ला स्वत:ला शहाणे समजणाऱ्या पालकांना व शिक्षकांना ते देतात.
शिक्षण म्हणजे डोक्यात सतत धुडघुस घालणाऱ्या माहितीचे भेंडोळे नाही. शीलवान, चारित्र्यवान माणसे घडवण्याचे ते एक प्रभावी साधन आहे, असा मौलिक विचार त्यांनी मांडला आहे. जो माणूस मोजकेच, परंतु चांगले विचार आपल्या जीवनात प्रत्यक्ष उतरवतो, तो माणूस ग्रंथसंग्रह कोळून प्यालेल्या माणसापेक्षा अधिक सुशिक्षित आहे, या शब्दांत त्यांनी माणसाच्या जीवनात शील तथा चारित्र्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. जे शिक्षण सामान्य समाजाला जीवनाभिमुख बनवू शकत नाही, चारित्र्य निर्माण करू शकत नाही, भूतदयाभाव चेतवू शकत नाही, सिंहपराक्रम उद्दीपित करू शकत नाही ते शिक्षण, ‘शिक्षणया संज्ञेस पात्र आहे का? असा विचाराला चालना देणारा प्रश्‍न ते विचारतात. माणूस आपल्या पायावर उभा राहू शकेल, अशा शिक्षणाची आवश्यकता ते प्रतिपादन करतात. अलिकडच्या काळातील व्यावसायिक शिक्षणाचे बीज विवेकानंदांच्या या विचारात आपल्याला दिसते.
मनाची एकाग्रता ही शिक्षणाची एकमेव पद्धती आहे, असे प्रतिपादन विवेकानंद करतात. जेवढी एकाग्रता अधिक, तेवढे ज्ञानसंपादनही अधिक. म्हणून एकाग्रता हीच ज्ञान भांडार उघडू शकणारी एकमेव गुरूकिल्ली आहे, हे ज्ञानप्राप्तीची इच्छा बाळगणाऱ्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे, असे ते ठासून सांगतात. सामान्य माणसात आणि थोर माणसात एकाग्रतेच्या कमी-अधिकपणामुळेच फरक पडत असतो, असेही ते सांगतात. विविध घटनांच्या संग्रहामध्ये नव्हे, तर एकाग्रतेतच शिक्षणाचे खरे सार आहे असे सांगून, ‘पुन्हा शिकण्याची संधी मिळाली तर मी नुसत्या घटनांकडे लक्ष न देता, हव्या त्या गोष्टींवर मन एकाग्र करण्याची व हव्या त्या गोष्टींपासून मनाला अलग ठेवण्याची माझी शक्ती मी प्रथम वाढवीन आणि त्या संपूर्ण कार्यक्षम साधनांच्या साहाय्याने स्वेच्छेनुसार घटनांचा संग्रह करीत राहीन’, असे त्यांनी म्हटले आहे. एकाग्रतेच्या अभावामुळे मन व्यर्थ गोष्टींत गुंतून आपली शक्ती वाया जाते, असे स्पष्टीकरण ते देतात.
शील घडवण्याच्या बाबतीत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतानाशील म्हणजे एखाद्या माणसामधील प्रवृत्तींचा समुच्चय किंवा त्याच्या मानसिक कलांची गोळाबेरीजअशी शील या संकल्पनेची व्याख्या त्यांनी केली आहे. सत्प्रवृत्तींचा पूर्ण प्रभाव मनावर असला म्हणजे माणसाच्या मनात काही वाईट करण्याचा विचार आला तरी सत्प्रवृत्तींचा प्रवाह त्याला तसे करू देणार नाही. अशा प्रकारे सत्प्रवृत्तींनी विचारांवर विजय मिळवला म्हणजे शील बनले असे म्हणता येते, असे स्पष्टीकरण ते या संदर्भात देतात. देतात. शील घडवण्यात चांगल्या आणि वाईट गोष्टीं, सुख आणि दु:ख यांचा सारखाच वाटा असतो. किंबहुना सुखापेक्षा दु:खामुळे, संपत्तीपेक्षा दारिद्य्रामुळे, आणि स्तुतीपेक्षा आघातामुळेच माणसाला अधिक शहाणपण येते आणि त्याच्यामधील अंत:स्थ तेज अधिक खुलवते, असे विवेकानंद ठामपणे सांगतात. एखाद्याचे शील आजमावताना त्याने केलेल्या मोठमोठ्या गोष्टीं विचारात न घेता, सामान्य गोष्टींतून त्याची पारख करा, कारण चारित्र्यवान माणसाचे चारित्र्य साध्या, क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींमधूनच प्रत्ययास येते. मोठमोठ्या प्रसंगी अगदी सामान्य माणूससुद्धा महान कृत्य करू शकतो. परंतु खऱ्या थोर पुरुषाचे चारित्र्य सर्वत्र आणि सदासर्वदा श्रेष्ठ असते, असे अत्यंत मूलगामी विचार त्यांनी मांडले आहेत. हे विचार आजच्या काळातील नैतिक शिक्षणाकडे वक्र दृष्टीने बघणाऱ्या तज्ज्ञांनी आवर्जून लक्षात घ्यायला हवेत.
अज्ञानामुळे आणि दुर्बलतेमुळेच चुका होतात. परंतु चुका घडल्या म्हणून विलाप करीत न बसता अज्ञान दूर करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे, हा त्यांचा सल्ला निराशेच्या अंध:काराने ग्रासलेल्या आजच्या तरूण पिढीस खूपच महत्त्वाचा आहे. अंधाराकडे बघून रडत बसण्यापेक्षा, आगपेटीची एक काडी ओढलीत, तर एका क्षणात अंधार नाहीसा होईल’, हे स्वामीजींचे सांगणे नव्या पिढीने खरोखरच मनावर घ्यायला हवे.
आजच्या तरूण पिढीस शब्दांनी इतरांवर प्रभाव पाडण्याची सवय मोठ्या प्रमाणात जडलेली दिसते. विवेकानंदांनी मात्र शब्दांपेक्षा, विचारांपेक्षा आणि बुद्धीपेक्षा माणसाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभावच दुसऱ्यावर अधिक पडतो, असे आवर्जून सांगितले आहे. व्यक्तिमत्वाचे स्वरूप बाह्य शारिरीक रूपावर अवलंबून नसते, तर ते माणसाच्या कर्मामधून प्रकट होत असते, असे सांगून सर्व शिक्षणाचा हेतू माणसाचे व्यक्तिमत्व घडविणे हाच असायला हवा, असा विचार ते मांडतात. संपूर्ण शिक्षणप्रक्रिया ही व्यक्तिमत्व विकासाचीच प्रक्रिया असल्याचे ते सांगतात.
गुरु आणि शिष्य यांच्या नातेसंबधांविषयीचे विवेकानंदांचे विचार फार मौलिक आहेत. चारित्र्यवान शिक्षकाशिवाय कोणत्याही प्रकारचे शिक्षण होऊ शकत नाही, असा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. चारित्र्यवान, त्यागी गुरुच्या सहवासातच माणसाचे जीवनशिक्षण होते, असे सांगून शिक्षणासाठी गुरुगृहवास आवश्यक असल्याचे ते सांगतात. पावित्र्य, ज्ञान मिळवण्याची तहान, चिकाटी, सहनशीलता, इंद्रिय नियमन, फललाभाच्या भावनेचा अभाव, सर्वोच्च ज्ञान प्राप्त करण्याचे उद्दीष्ट इत्यादी गुण शिष्याच्या बाबतीत आवश्यक आहेत, याची आठवण ते करून देतात.
गुरुबद्दल श्रद्धा, आदर, विनय, शरणागती असल्याशिवाय शिष्याची कशातही प्रगती होत नाही, हे सत्य ते आग्रहपूर्वक मांडतात. पण त्याचबरोबर गुरुला ईश्‍वर मानतानाच, त्याचे अंधानुकरण करू नका, आणि त्याच्यावर भरपूर प्रेम करतानाच, स्वत: विचार करण्यास विसरू नका, असा मौलिक सल्ला द्यायलाही ते विसरत नाहीत. गुरुला शास्त्रांचे अचूक मर्म ज्ञात असले पाहिजे, आणि साऱ्या मानवजातीबद्दलची सात्विक आपुलकी ही त्याच्या कार्याची प्रेरणा असली पाहिजे, असे ते सांगतात.
स्त्री शिक्षणाचे महत्त्व प्रतिपादन करताना, स्त्रियांना योग्य तो सन्मान दिल्यानेच कोणत्याही राष्ट्राची उन्नती होते, हे विवेकानंदांचे आग्रही म्हणणे आहे. ते सांगतात की, स्त्री ही ईश्‍वर या सर्वव्यापी शक्तीचा आविष्कार आहे. स्त्रीची शक्ती जो समाज जाणतो तोच समाज शक्तिपूजक समजला पाहिजे.
शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच सर्वसाधारण समाजाचे शिक्षणही होणे कसे गरजेचे आहे, हे स्वामी विवेकानंद पटवून देतात. राष्ट्राची प्रगती सर्वसाधारण समाजाच्या शिक्षणाच्या प्रसारावर आणि बौद्धिक दर्जाच्या वाढीवर अवलंबून असते, असे त्यांचे म्हणणे आहे. समाजातील मूठभर लोक शिकून समाजाचे व देशाचे उन्नयन होत नसते. त्यासाठी सर्वसामान्य लोकांत शिक्षणाचा प्रसार आवश्यक असतो. समाजातील सर्वसामान्यांचे शिक्षण त्यांच्या मातृभाषेतून झाले पाहिजे, असेही ते आग्रही प्रतिपादन करतात.
स्वामी विवेकानंदांचे हे शिक्षणविषयक चिंतन पाहता त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाची आणि द्रष्टेपणाची प्रचिती आल्याखेरीज राहात नाही. प्रत्यक्ष या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या मार्गदर्शनाच्या दृष्टीने आणि माणसाच्या समग्र विकासाच्या दृष्टीनेही ते अत्यंत मूलगामी स्वरूपाचे आहेत. ते आजही प्रेरक, कृतिशील आणि उपयुक्त आहेत.

शनिवार, ६ जानेवारी, २०१८

वेलकम अगेन...



प्रतिकात्मक छायाचित्र

(हा प्रसंग व त्यातील पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून छायाचित्रही प्रतिकात्मक आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी.)

त्या... हो त्याच महाबळेश्वरसदृश निसर्गरम्य पर्यटनस्थळी दरीच्या टोकावर अवघ्या चार सागाच्या ओंडक्यांवर उभारलेला उदय शेट्टीचा तो वन रुम महल... त्या समोरच्या एका डेरेदार वटवृक्षाखाली एक टेंट... त्या टेंटमध्ये एका बाजल्यावर त्या दोन अतिलावण्यवती ललनांकडून फेशियल करवून घेण्यासाठी नेहमीप्रमाणं पहुडलेला उदयभाय... त्याच्या डोळ्यांवर गारव्यासाठी ठेवलेले काकडीचे काप –नेहमीप्रमाणं... मजनुभायच्या संपूर्ण तोंडावर लावलेला फेशियलचा लेप- तोही नेहमीप्रमाणेच... तेवढ्यात मजनुभायची त्याच्या दोन पंटरांसमवेत तिथं झालेली एंट्री... तीही नेहमीप्रमाणंच... उदयभायच्या उजव्या डोळ्यावरील काकडीचा काप त्यानं उचलून खाणं... तेही... एकदम बरोबर... नेहमीप्रमाणंच...

(अब आगे)

मजनु:  क्या भाय वेलकम बॅक फ्लॉप हो गई, फिर भी तुम अभी भी ये मेकप-वेकप सब छोडा नै।

उदय: अबे, मजनु, साले तू येडा का येडा ही रहेगा। एक पिच्चर फ्लॉप हुई तो क्या? अपने पास बँकॉकवाले की दुआ से अभी भी बहोत माल है। और एक बनाएँगे। उसमे क्या है?

मजनु: ये बात तो ठीक है। लेकिन कभी समझ लो, वो भी पिच्चर फ्लॉप हो गई तो, समझ लो कही सचमुच में तुम को बाजार में कांदे ले लो, आलू ले लो करते हुए कांदा –बटाटा न बेचना पडे?

(मजनुभाय स्वतःच्याच या वाक्यावर दात विचकून, डोळे मिचकावून मोठमोठ्यानं हसू लागतो. त्यावर त्याचे पंटरही त्याला जोराची टाळी देऊन हसू लागतात. तेवढ्यात डोळे झाकलेल्या अवस्थेतच उदयभाय त्याच्या गालावर जोराची चापटी देतो.)

उदय:  स्साला, जब भी मुँह खोलेगा, गंदगीही निकलेगी। तेरे जलने की बदबू आ रही हैं मुझे। जल्दी बक, क्या बकने आया था, और निकल ले जल्दी से।


मजनु: भाय, आजका पेपर पढे की नहीं। या सुबह आँख बिना खोले ही यहाँ मसाज के लिए लेट गए हो।
(पुन्हा फिदीफिदी हसतो. आता उदयभायला गुस्सा कंट्रोल होत नाही. तो उठून मजनुला मारणार, एवढ्यात त्याला काही आठवतं...)

उदय: (स्वतःच्यात हृदयावर हात ठेवत स्वतःला समजावतो) कंट्रोल... कंट्रोल... अरे, तुने पढा है तो तू बता न्ना।

पंटर-: भाय, अगर मजनुभाय को पढना आता, तो हमें अपनी नौकरी पर क्यूँ रखता? (आता पंटर-१ पंटर-२च्या हातावर टाळी देतो.)

मजनु: (स्वतःची पोलखोल सहन न होऊन गडबडीनं..) अबे चूप कर ओय । (उदयभायकडं वळत) तो भाय पेपर में ऐसा छपा है के सरकार हम लोग को अभी पुलिस प्रोटेक्शन देने का सोचरैली है।

उदय: हम लोग को... मतलब?

मजनु: क्या भाय हम लोग को मतलब- हम लोग को... हम अंडरवर्ल्डवालों को।

उदय: मैने तेरे को सही पैचाना था। तू येडा ही है। अबे अगर तू किसी की सुपारी लेगा, तो क्या उसका गेम बजाने के लिए साथ में पुलिस को ले जाएगा?

मजनु: हाँ, भाय... ये बात तो अपने दिमाग में आईच नै। (आता ट्यूबलाईट पेटून) और भाय सोचो ना.. अगर फिर भी गेम बजाने के लिए साथ में पुलिस रहेगी तो अपना काम कितना आसाँ हो जाएगा। हम पुलिस को लेकर उसके एरिया में घुसकर उसको आराम से मारेंगे... और सोचो पुलिस प्रोटेक्शन मे ही आराम से निकल लेंगे। हम रहेंगे तो पुलिस को कोई हाथ भी नहीं लगाएगा। और पुलिस साथ में रहेगी तो अपना भी कॉन्फिडन्स कितना बढेगा ना भाय, सोचो।

उदय: बात तो सही है। लेकिन पहले ये बता, ये सरकार हमें काय को प्रोटेक्शन दे रही है? कहीं साथ में रहकर अपना गेम बजाने का तो इरादा नहीं। मैंने अब तक ५६ फिल्म में ऐसे ५६ क्रिमिनल्स को ऐसे ही मारा था... भगा भगा के।

मजनु: नहीं भाय... सरकार बोल रहेली है के जो भी अंडरवर्ल्डवाला उनके पास प्रोटेक्शन माँगेंगा, उसको वो देंगे।

उदय:  लेकिन, मेरी समझ में ये नहीं आ रहा, के ऐसा कौन XXX अंडरवर्ल्डवाला है, जो अपनी हिफाजत के लिए पुलिस के पास जाएगा? और फिर सरकारी प्रोटेक्शन मनी की रेट भी अपने से ज्यादा ही होगा ना? परवडेगा किसको?

मजनु: नहीं भाय, वैसा नहीं है। जो प्रोटेक्शन माँगेगा, उसके साथ हर वक्त पुलिस रहेगी और उसको वो कोई गैरकानूनी काम नहीं करने देगी। लेकिन भाय, एक बात तो है, आपके इन काले कपडोंवाले मुश्टंडो से ज्यादा अगर आप पुलिस प्रोटेक्शन में निकलोगे क्या वट होगी आपकी शहर में। आपके बंगले के बाहर पुलिस... आपके साथ पार्टियों में पुलीस... फिल्म की शूटिंग में पुलिस... भाय.... सोचो... सोचो....

(उदयभाय ट्रान्समध्ये जातो... मजनुनं केलेल्या वर्णनांची दृश्यं त्याच्या नजरेसमोर तरळू लागतात... तो हरखून जातो...)

उदय: वाह रे मजनु, क्या अक्ल की बात की है तुने... जल्दी से अपनी अर्जी तैयार करने को बोल... इस शहर में सबसे पहले पुलिस प्रोटेक्शन मुझे ही मिलना चाहिए... याद रख्ख।

मजनु: (विचारमग्न होत) भाय, वो सब तो मैं मॅनेज कर लूँगा... लेकिन फिर आप कोई गैरकानुनी काम नही कर सकोगे, उसका क्या?

उदय: (प्रेमानं त्याच्या डोक्यावर टपली मारत) वो सब सँभालने के लिए तू और तेरे ये पंटर है ना भाय...

(असं म्हणत आता उदयभाय विकट हास्य करू लागतो... मजनु आणि त्याचे पंटर एकमेकांकडं पाहात तिथून कल्टी मारतात...)