सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

अस्तित्वशोध...

 


 

तू पड बाहेर शोधार्थ स्वतःच्या,

का हताश आहेस?

तुझ्या अस्तित्वशोधाची

काळालाही आस आहे।।

 

पिढ्यापिढ्यांच्या या बेड्यांना,

समजू नको तू दागिना,

या बेड्यांनाच वितळवून

बनव त्यांचे शस्त्र तू।।

 

चरित्र इतुके पवित्र जरी,

लांच्छन का तुजवरी,

काय हक्क या पाप्यांना,

परीक्षा घेण्या तुझी? ।।

 

जाळुनि भस्म कर त्या

क्रूरतेच्या महाजालाला,

तू आरतीची ज्योत नव्हेस,

क्रोधाची मशाल आहेस।।

 

फडकावुनि पदर ध्वजासम

गगनालाही कंपवुनि सोड,

पदर तुझा हा पडता खाली,

धरणीकंप निश्चित आहे।।

 

तू पड बाहेर शोधार्थ स्वतःच्या

का हताश आहेस,

तू चालत राहा,

तुझ्या अस्तित्वशोधाची,

काळालाही आस आहे।।

 

मूळ कविता- तन्वीर गाजी

अनुवाद- आलोक प्रियदर्शन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा