बुधवार, २९ जुलै, २०२०

... तरच जिवंत तुम्ही!हृदयात घेऊनि अस्वस्थता
चालत असाल तुम्ही,
तरच जिवंत तुम्ही।।

नजरेत असतील स्वप्नांच्या
चमकत्या विजा तुमच्या,
तरच जिवंत तुम्ही।।

हवेच्या झुळुकांसम
स्वतंत्र राहा,
महाप्रचंड सागरासम
लाटांमध्ये वाहा,
हर क्षणाला भिडा, भेटा,
फैलावुनी बाहु तुमचे,
प्रत्येक क्षण, प्रत्येक दृष्य
अनुभवू द्या तुमच्या नजरेला।
या नजरेत तुमच्या
असतील नवलाईच्या छटा,
तरच जिवंत तुम्ही।।

हृदयात घेऊनि अस्वस्थता,
चालत असाल तुम्ही,
तरच जिवंत तुम्ही।।मूळ कविता- जावेद अख्तर

अनुवाद- आलोक ‘प्रियदर्शन’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा