Alok Jatratkar |
कोल्हापूर, दि. १३ एप्रिल: येथील शिवाजी
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांना वृत्तपत्रविद्या व
संवादशास्त्र विषयामध्ये शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर झाली आहे.
आलोक जत्राटकर यांनी ‘दलितमुक्तीचा प्रश्न: ब्राह्मणेतर आणि
दलित वृत्तपत्रांच्या भूमिकेचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर
विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला. वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाचे माजी
प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
जत्राटकर वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विषयातील
नेट व सेट परीक्षाही उत्तीर्ण आहेत. त्यांना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद
शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. अशोक चौसाळकर
आणि डॉ. एन.डी. जत्राटकर यांचे प्रोत्साहन लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा