डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते प्रकाशन
 |
अनुप जत्राटकर यांच्या 'निष्पर्ण पिंपळाच्या छायेत' या एकांकिका संग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. अच्युत माने, श्रेणिक पाटील. |
 |
अनुप जत्राटकर यांच्या 'निष्पर्ण पिंपळाच्या छायेत' या एकांकिका संग्रहाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे, डॉ. अच्युत माने यांच्यासह अन्य मान्यवर. |
 |
अनुप जत्राटकर यांच्या सन्मानचिन्ह देऊन गौरव करताना डॉ. आ.ह. साळुंखे. |
 |
अनुप जत्राटकर यांच्या एकांकिका संग्रहाबद्दल आत्मियतेने जाणून घेताना डॉ. आ.ह. साळुंखे. |
कोल्हापूर, दि. २४ नोव्हेंबर: लेखक-दिग्दर्शक अनुप
जत्राटकर यांच्या ‘निष्पर्ण पिंपळाच्या छायेत’ या एकांकिका
संग्रहाचे ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या हस्ते आज कारदगा येथे
झालेल्या २४व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन करण्यात आले.
जत्राटकर यांची ही पहिलीच साहित्यकृती आहे.
 |
निष्पर्ण...चे मुखपृष्ठ |
‘निष्पर्ण
पिंपळाच्या छायेत’ या
एकांकिका संग्रहात ‘निष्पर्ण
पिंपळाच्या छायेत’सह
असंबद्ध, आरोपी, ती यशोधरा उरली फक्त आणि कंकाली अशा विविध राज्यस्तरीय व
राष्ट्रीय एकांकिका स्पर्धांमध्ये पुरस्कारप्राप्त एकांकिकांचा समावेश आहे.
कोल्हापूरच्या तेजस पब्लिकेशनच्या वतीने हा संग्रह प्रकाशित करण्यात आला असून विकास प्रिंटींग अँड कॅरिअर्स प्रा.
लि. येथे मुद्रण केले आहे. मीडियाटेक, कोल्हापूरचे राजेश शिंदे यांनी मांडणी केली
असून माधव चांदेकर यांनी मुखपृष्ठ साकारले आहे. ज्येष्ठ अभिनेते व नाट्यकर्मी डॉ.
शरद भुथाडिया यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे.
आज कारदगा येथे झालेल्या या संग्रहाच्या प्रकाशन
प्रसंगी व्यासपीठावर मुनीश्री प्रसंगसागरजी महाराज, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अच्युत
माने, ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे, कारदगा साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष
प्रकाश काशिद, डॉ. एन.डी. जत्राटकर यांच्यासह कारदगा ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा
नंदिनी हेगडे, शिरोळच्या दत्त शेतकरी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रेणिक
पाटील, अॅड.चंद्रकांत कोरे-रेंदाळकर, उद्योजक एस.एम.
माळी, ज्येष्ठ शिक्षक एन.के. प्रताप, प्रा. प्रशांत मोरे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा