शून्यातून
एखादी गोष्ट निर्माण करण्याची प्रक्रिया मुळातच खूप गंमतीची असते. ही प्रक्रियाच खऱ्या
अर्थानं आपल्याला जगायला शिकवते. या साऱ्या प्रवासात कित्येकदा निराशाही वाट्याला येते.
पण, तुम्हाला सांगतो, जगात इतकी सॉलिड, फँटॅस्टिक आणि कमाल माणसं आणि सुंदर पुस्तकं
आहेत की, या साऱ्या निराशेतून तुम्हाला सावरायला मदत करतात; पुन्हा उभं राह्यला शिकवतात.
एक उदाहरण देतो, 'गांधी विरुद्ध गांधी'च्या वेळी मी सर्वप्रथम गांधी वाचायला हातात
घेतले. तुम्हाला खरं सांगतो, इतका महान विचारांचा आणि कृतीचा माणूस जगात आजतागायत दुसरा
झाला नाही. आजकाल तर गांधींना नावं ठेवून मोठे व्हायचे दिवस आलेत, तेही पुन्हा त्यांचं
प्रत्यक्षात काहीही न वाचता आणि कोणी तरी सांगतो म्हणून. हे चुकीचं आहे. तो माणूस काय
म्हणतो हे आधी वाचाल तरी?, त्याचं सांगणं काय आहे, त्यामागची त्यांची भूमिका काय आहे,
हे समजून तरी घ्याल? पण नाही. आपण अख्ख्याच्या अख्खा माणूसच नाकारुन रिकामे होतो. ठीक
आहे, त्यांच्या काही भूमिका, काही तत्त्वं पटत नसतीलही एखाद्याला. पण, तेवढे दोन मुद्दे
ठेवा ना बाजूला. बाकीचं चांगलं आहे, ते तरी स्वीकाराल की नाही? हा स्वीकार, आपली स्वीकारार्हता
किती अत्युच्च कोटीची आहे, यावरुन तुमची संवेदनशीलता आणि तरलता किती आहे, हे निश्चित
होते.सोमवार, २३ मार्च, २०१५
ऊर्जा-2: स्वतःच्या जगण्याच्या व्याख्या स्वतःच निर्माण करा: अतुल कुलकर्णी

होते.रविवार, २८ सप्टेंबर, २००८
एका क्लिकवर महाराष्ट्र!
(दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत रविवार पुरवणीमध्ये दि. २८ सप्टेंबर २००८ रोजी वरिष्ठ प्रतिनिधी श्री. अतुल कुलकर्णी यांनी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम असलेल्या 'महान्यूज' वेब पोर्टलविषयी लिहीलेले विशेष फीचर...)
मुंबई, दि. २७ सप्टेंबर : एखाद्या कॉर्पोरेट ऑफिस थाटणाऱ्यालादेखील शक्य न होणारे कार्य माहिती व जनसंपर्क विभागाने एका क्लिकसरशी करून दाखविले आहे. राज्याचा हा विभाग जगाच्या गतीसोबत धावू शकतो हे दाखवून देताना महाराष्ट्राच्या उदरात काय काय दडले आहे, याचा खजिनाही ई-वाचकांसाठी खुला करण्याचे मोठे काम या विभागाने केले आहे. हे करत असताना महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटलादेखील मोठे आव्हान या पोर्टलने उभे केले आहे.
माहिती खात्याकडून बातम्यांचे टपाल आले की आता घरी जाण्याची वेळ झाली असा समज गेली काही वर्षे रुढ होता. कारण सगळ्या दैनिकांमधे आपापले काम आटोपून घरी निघाल्यानंतर कधीतरी दिवसभर काय घडले, याचे टपाल येत असे. ते टपाल यायचे, ते देखील विस्कळीत स्वरुपात. काळ बदलला. कॉम्प्यूटर आले, तसे बातम्यांचे स्वरुप बदलले. त्यानंतर कालांतराने माहिती आणि जनसंपर्क विभाग चर्चेत आला तो रंगीत लोकराज्यने स्वतःचे रंगरुप बदलत माहिती देण्याची पद्धती देखील बदलली तेव्हा. त्याच काळात दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन सुरु करण्यात आला. (त्यासाठी या खात्याने ऊर्जा विभागाला धन्यवाद द्यायला हवेत. कारण गावात सकाळी-सकाळी लाईट गेले की बंद पडलेले रेडिओ सुरु होतात आणि त्यावर दिलखुलास कार्यक्रम लागतो !) त्यानंतर या विभागाकडून 'जय महाराष्ट्र' या सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रमाद्वारे मंत्र्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांच्या माहितीपूर्ण मुलाखती येऊ लागल्या. पण माहिती खात्याचे बातम्या देण्याचे मुख्य काम खऱ्या अर्थाने आजच्या काळाशी सुसंगत झाले ते महान्यूज या पोर्टलमुळे!
एकेकाळी राज्यातल्या विविध दैनिकांना शासकीय बातम्या पुरविणारा विभाग अशी स्वतःची ख्याती या विभागाने पूर्णपणे पुसून स्वच्छ करीत आधुनिक जगाशी नवी ओळख करून दिली. आज http://www.mahanews.gov.in या पोर्टलमध्ये किमान पाच दहा दैनिकं चालविण्याची ताकद आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. महाईव्हेंन्ट, साक्षात्कार, महासंस्कृती, तारांकित, फर्स्टपर्सन, चौकटीबाहेर, महाऑप, गॅलरी, हॅलो अशा विविध सदरांच्या माध्यमातून या पोर्टलने अवघा महाराष्ट्र एका क्लिकवर आणून ठेवला आहे. केवळ एवढेच नव्हे, तर बंद पडलेले एम्प्लॉयमेंट न्यूज कल्चरदेखील या महान्यूजने जिवंत केले आहे. या पोर्टलवरील 'महाऑप' या सदरात नोकरी मिळण्याची किमान सहा हजार ठिकाणं उपलब्ध करून दिलेली आहेत. सरकार केवळ माहितीच देते, असे नाही; तर, त्यासोबत तुम्हाला रोजगारही देते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. इंडो-तिबेट पोलीस दलात ६६ जागा भरल्या जाणार आहेत, इथपासून ते बँक ऑफ बडोदामध्ये लिपिकाच्या हजार जागा भरणार आहेत, हे सांगण्याचे व त्याच्याशी संबंधित ईमेल किंवा वेबसाईट सांगण्याचे कामही हे पोर्टल करीत आहे. (मनसेच्या कार्यकर्त्यांनादेखील कोठे मराठी तरुणांना नोकऱ्या आहेत हे शोधण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो !)'
एकीकडे नोकरी सांगण्याचेच काम हे पोर्टल करते, असे नाही; तर, त्यासोबत महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती, श्रद्धास्थाने, वस्त्रप्रावरणे, लोककला, संतपरंपरा, सण-उत्सव, गडकिल्ले यांची माहिती, नवनवीन बातम्या, वेगवेगळ्या मुलाखती, राज्यभरातील विविध फोटो असा खजिनाच यातून खुला होतो.
माहिती खात्याला 'गुडलूक' देणाऱ्या खात्याच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर या पोर्टलच्या एडिटर इन चिफ आहेत, तर सीईओची जबाबदारी दमदारपणे सांभाळली आहे श्रद्धा बेलसरे यांनी. त्यांच्या टीममध्ये डॉ. गणेश मुळे यांच्यासोबत वर्षा आंधळे, आलोक जत्राटकर, डॉ. किरण मोघे, नंदकुमार वाघमारे, अंजू कांबळे, प्रमोद धोंगडे, मंगेश वरकड यांच्यासह मयुरा देशपांडे, सुनील पाटील, अरविंद जक्कल असा चमू काम करीत आहे. कधी काळी हे सगळे लोक सरकारी खात्यात काम करीत होते, हे सांगताना आता संकोच वाटावा, इतका व्यावसायिकपणा या सगळ्या टीममध्ये आला आहे. अर्थात याचे सारे श्रेय दिलखुलासपणे मनीषा म्हैसकर यांनाच द्यावे लागेल. संपूर्ण विभागाला सतत नवनव्या योजनांत गुंतवून टाकण्याचे व कात्रणं कापण्यातून सुटका करण्याचे काम त्यांनी केले. पोर्टलमुळे विभागाची प्रतिमा बदलली, काम करणाऱ्यांमध्ये जबरदस्त आत्मविश्वास आला. आता या विभागात काम करणाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था मात्र समाधानकारक नाही. ती देखील 'गुडलूक' असायला हवी. तेवढे झाले की मंत्रालयात एखादे कॉर्पोरेट ऑफिस कार्यरत असल्याची जाणीव सतत सगळ्यांना होत राहील.