वर्धा इथे सामाजिक, सांस्कृतिक व वाङ्मयीन चळवळीत अग्रेसर असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानने 'समाज आणि माध्यमं' या ग्रंथाला वैचारिक साहित्यासाठीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार - २०२६ प्रदान करीत असताना ज्या शब्दांत या साहित्यकृतीचा गौरव केला आहे, तो निश्चितच प्रेरणादायी आहे.
शनिवार, २५ एप्रिल, २०२६
'समाज आणि माध्यमं': नवमाध्यमनिर्मित प्रश्नांना वाचा फोडणारा वैचारिक आवाजग्रंथ
मंगळवार, १९ ऑगस्ट, २०२५
संवेदनशील माध्यमकर्मीचे जाणिवासमृद्ध लेखन
('दै. सकाळ'च्या साप्ताहिक 'सप्तरंग' या रविवार विशेष पुरवणीमध्ये 'समाज आणि माध्यमं' व 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या पुस्तकांविषयी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी लिहीलेला परिचयपर लेख...)
शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आणि लेखक, वक्ते डॉ. आलोक जत्राटकर यांची ‘समाज
आणि माध्यमं’ आणि ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ ही दोन पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत. एका
संवेदनशील आणि जबाबदार माध्यमकर्मीने केलेले अत्यंत जाणिवासमृद्ध आणि समाजभान
विस्तारणारे असे हे लेखन आहे. “We, the people…” या संविधानाच्या संदर्भाने अत्यंत
महत्त्वाच्या असलेल्या ‘लोकां’चा शोध व वेध, त्यांचे समस्यासूचन आणि निराकरण
यामध्ये त्यांना स्वारस्य आहे. या जाणिवांतूनच ही दोन्ही पुस्तके त्यांनी लिहीली
आहेत. या पुस्तकांना अनुक्रमे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस आणि ज्येष्ठ समीक्षक
डॉ. रणधीर शिंदे यांच्या प्रस्तावना लाभलेल्या आहेत, यावरून या दोन्ही पुस्तकांचा
दर्जा लक्षात यावा.
डॉ. आलोक जत्राटकर यांचा ‘ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे’ हा मुक्तचिंतनपर
लेखसंग्रह आहे. डॉ. आलोक यांनी या पुस्तकात स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, भगवान बुद्ध, भगवान महावीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, संत तुकाराम अशा थोर संत-विचारवंतांची
पानोपानी आठवण केलेली आहे. विविध विषयांवरील लेख असले तरी समाजभान, जनभान, लोकभान अशा गडद छटा त्यांत आहेत. लेखांमधील
व्यक्तिगत संदर्भ व्यापक सामाजिकतेशी नाते जोडणारा आहे.
संग्रहातील पहिल्याच लेखात ते निपाणी या शहराबद्दल,
त्याने दिलेल्या संस्काराबद्दल ते आत्मीयतेने लिहितात. ‘आई माझा गुरू’ या
भावस्पर्शी लेखात दुर्दम्य आशावाद आणि भविष्यवेधी विचार असलेल्या आपल्या आईचे आलोक
यांनी चितारलेले व्यक्तिचित्र मनाला भिडणारे आहे. ‘ब्लॅक व्हाईट अन ग्रे’ या
पुस्तकाच्या शीर्षलेखात लेखक ब्लॅक आणि व्हाईट या ‘हे किंवा ते’, ‘काळे किंवा पांढरे’, रंगीत किंवा बेरंगी या संकोची, आडमुठ्या दृष्टिकोनावर भाष्य करतात. या
सर्वांपलीकडे आयुष्य निसर्गतः सप्तरंगी आहे, ते तसेच जपावे, असे त्यांना वाटते. डिकास्ट व्हावं कसं?, युनिफॉर्म, शहर में शायद दंगा होने वाला है, सोसायटी अन समाज, दुःखनिवृत्ती अशा सर्वच लेखांतून लेखक
समाजातील वेचक वेधक प्रश्नांवर मार्मिक भाष्य करतात. यातील लेखांना सजग चिंतनाची
बैठक आहे.
डॉ. जत्राटकर यांनी लिहिलेले 'समाज आणि माध्यमं' हे आभासी वास्तवात जगणाऱ्या सर्वांना
माध्यमांची ओळख करून देणारे आणि आपली माध्यम साक्षरता वाढविणारे पुस्तक आहे. विविध
समाज माध्यमांचा वापर करताना आपण जवळजवळ ७०-८० टक्के लोक या माध्यमांना अडाणीपणे
हाताळतो. भारतातील टेली-कम्प्युटर क्रांती, फेसबुक, वाय-फाय, ट्रोलिंग, पॉर्न, गेमिंग, डिजिटायझेशन, ऑनलाईन, स्मार्ट एज्युकेशन या जंजाळात आपण
अडकलो आहोत. याविषयी सांगोपांग माहिती देणारे आणि या माध्यमांचा वापर कसा करावा, याबाबत आपणास शहाणे करणारे हे पुस्तक
आहे.
माध्यमांच्या प्रांतातील सर्वोच्च पदवी
घेतलेल्या आणि अनेक माध्यमांमध्ये शहाणपणाने, विवेकाने वावरलेल्या व्यक्तीने हे पुस्तक साकारले आहे. मानवी
आयुष्यावर इष्ट, अनिष्ट प्रभाव टाकणारी माध्यमे आणि त्यांचा वापर अशा गंभीर विषयावर
चिंतनशील मांडणी या पुस्तकात आहे. मीडिया मॅनिया, मीडिया फ्रेंजी, मीडिया अॅडिक्ट होत चाललेल्या समाजाने
विशेषतः तरुणांनी हे पुस्तक वाचून सदैव सोबत ठेवायला हवे. दुभंगलेली माणसे, कुटुंबे, समाज आणि वेगाने दुभंगत चाललेले जग या
सर्व गोष्टींचा माध्यमांशी थेट, रोजचा संबंध आहे. अशा माध्यमांबाबत 'मीडिया लिटरसी' आजच्या वास्तवात अनिवार्य आहे. एका
दृष्टीने आपल्याला माध्यमांची ओळख, माध्यम वापराचे गांभीर्य, समाजावरचे परिणाम या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला
हवे. पौगंडावस्थेतील पॉर्न आणि उद्ध्वस्त
होत चाललेले मुलांचे भावविश्व या गंभीर विषयाचे या पुस्तकात लेखकाने गांभीर्याने
वर्णन केलेले आहे. पॉर्न बंदी, लिव इन, गेमिंग या गंभीर विषयांवर हे पुस्तक भाष्य करते आणि सावध करते. पुस्तकात स्मार्ट एज्युकेशन, ऑनलाईन शिक्षण, कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण या
महत्त्वाच्या विषयांवर उत्तम भाष्य केले आहे. जाणकार आणि सदैव वर्गात, मुलांत राहावे वाटणाऱ्या शिक्षकांनी हे
लेख अवश्य वाचले पाहिजेत. बाजार, जाहिरात, जागतिकीकरण, निवडणुका, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सर्व समाजावर प्रभाव टाकणाऱ्या मानवी
जीवनाच्या सर्व क्षेत्रात उलथापालथ घडवणाऱ्या विषयांवर डॉ. आलोक यांनी सखोल आणि
जबाबदारपणे लिहिले आहे. माध्यम क्षेत्रातील लोक, माध्यमांचा वापर, गैरवापर करणारे लोक, राजकारणी, समाजधुरीण, महिला, सर्वच शाखांतील शिक्षक, विद्यार्थी अशा सर्वांनीच हे पुस्तक वाचायलाच हवे.
१.
ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे
लेखक- डॉ. आलोक जत्राटकर
भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठे- १२६
किंमत- रु. २५०/-
२.
समाज आणि माध्यमं
लेखक- डॉ. आलोक जत्राटकर
अक्षर दालन, कोल्हापूर
पृष्ठे- १८४
किंमत- रु. ३००/-
बुधवार, ३० जुलै, २०२५
'समाज आणि माध्यमं’ कोणासाठी? - डॉ. राजेंद्र पारिजात
ज्याला काय बोलायचं नाही, ते कळतं किंवा ज्याला काय लिहायचं नाही, ते कळतं, तो खरा वक्ता किंवा लेखक असतो, असे म्हणतात.
आलोक हा अशा वर्गवारीतला एक सूज्ञ,चाणाक्ष, दक्ष संपर्क अधिकारी आहे़.
पण मुळातील लेखनाची उर्मी या क्षेत्रातल्या कोणालाही स्वस्थ बसू देत नाही आणि ही अस्वस्थताच सृजनाचे खरे कारण आहे. या जाणिवेतून आलेलं आलोकचं 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक अनेक प्रकाराने मुद्रित माध्यमांच्या व्यवसायात कार्यरत असणाऱ्या जुन्या आणि डिजिटल व्यवसायात झेप घेणाऱ्या नव्या दोन्ही पिढ्यांसाठी एक आवश्यक संदर्भ म्हणून पुढे येत आहे़.
आजचा समाज डिजिटल दैनंदिनीत जगतोय – सोशल मीडिया, ट्रोलिंग, गेमिंग, पॉर्न, ऑनलाइन शिक्षण या सगळ्या चक्रव्यूहात अडकलेला आहे. अशा परिस्थितीत ‘समाज आणि माध्यमं’ हे पुस्तक म्हणजे माध्यम-साक्षरतेचा दीपस्तंभ आहे.
डॉ. आलोक जत्राटकर हे माध्यम क्षेत्रातील जाणकार अभ्यासक आणि अनुभवसंपन्न कार्यकर्ते असून, त्यांनी या पुस्तकात माध्यमांचा वैचारिक, सामाजिक आणि शैक्षणिक परिणाम समजावून सांगितला आहे.
हे पुस्तक केवळ माहिती देत नाही, तर विचार करायला लावणारं, सावध करणारं आणि दिशा दाखवणारं आहे.
📘 हे पुस्तक कोणासाठी?
1. विद्यार्थी (विशेषतः किशोरवयीन व तरुण वर्ग)
सोशल मीडियाचा भुरळ पाडणारा प्रभाव समजून घेण्यासाठी
पॉर्नोग्राफी, गेमिंग व्यसन आणि ट्रोलिंगपासून स्वतःला जपण्यासाठी
डिजिटल साक्षरतेसाठी आणि आत्मपरीक्षणासाठी
2. शिक्षक व प्राध्यापक
माध्यमांचा शैक्षणिक वापर आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी
"स्मार्ट एज्युकेशन" आणि कोरोनाकाळातील ऑनलाईन शिक्षणाच्या मर्यादा यावर सखोल विचार करण्यासाठी
नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करता यावे म्हणून
3. पालक
मुलांच्या ऑनलाईन जगातील प्रवासाचे वास्तव ओळखण्यासाठी
किशोरवयीन मुलांमधील भावनिक बदल, सोशल मीडियाचा प्रभाव आणि मानसिक आरोग्य यावर सजग राहण्यासाठी
4. माध्यमकर्मी व पत्रकार
माध्यमांच्या वापरातील जबाबदारी, प्रभाव आणि सामाजिक भान यावर विचार करण्यासाठी
माध्यम साक्षरतेच्या अंगाने सामाजिक चळवळ उभी करण्यासाठी
5. शासकीय धोरणकर्ते व सामाजिक कार्यकर्ते
डिजिटल युगात कायदेकानू, माध्यम धोरणं आणि जनजागृती मोहीम कशी असावी, याचा विचार करण्यासाठी
माध्यमांमुळे समाजात होणाऱ्या दुभंगांची चिकित्सा करण्यासाठी
6. राजकारणी व जनमत घडवणारे नेते
माध्यमांचा लोकमतावर कसा प्रभाव पडतो हे समजून घेण्यासाठी
प्रचार-प्रसार करताना वैचारिक जबाबदारी स्वीकारण्यासाठी
हे पुस्तक फक्त माहितीपर नाही, तर मार्गदर्शक, सावध करणारा आणि अंतर्मुख करणारा आरसा आहे.
‘समाज आणि माध्यमं’ हे वाचणं म्हणजे आपल्या आभासी वास्तवाचं आत्मपरीक्षण करणं – एक जबाबदार नागरिक, पालक, शिक्षक किंवा विद्यार्थी म्हणून.
- डॉ राजेंद्र पारिजात
An Essential Handbook for media literacy and media awareness: Dr. B. M. Hirdekar
(ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी.एम. हिर्डेकर यांनी 'समाज आणि माध्यमं' हे पुस्तक वाचून आपला चिकित्सक अभिप्राय स्वतंत्र पत्राद्वारे कळविला आहे. तो येथे देत आहे. या प्रोत्साहनपर शब्दांसाठी हिर्डेकर सरांचा मी मनापासून ऋणी आहे.)
रविवार, २७ जुलै, २०२५
‘समाज आणि माध्यमं’ ः माध्यमभान वाढवणारं पुस्तक
(शिवाजी विद्यापीठाच्या एम.ए. मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक तथा माझे मित्र डॉ. शिवाजी जाधव यांनी माझ्या 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकाविषयी फेसबुकवर लिहीलेली नोंद...)



