'न्यूज स्टोरी टुडे'वर आलोक जत्राटकर यांच्या पुस्तकांचा परिचय (दि. २८ जुलै २०२५)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे माजी संचालक आदरणीय श्री. देवेंद्र भुजबळ यांनी आपल्या 'न्यूजस्टोरी टुडे'च्या ऑनलाईन मंचावर माझ्या 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' व 'समाज आणि माध्यमं' या दोन्ही पुस्तकांची अगदी मनमुक्त दखल घेतली आहे. अगदी आवर्जून नोंद घेऊन प्रोत्साहनाचा हात पाठीवर ठेवल्याबद्दल भुजबळ साहेबांचा मी कृतज्ञ आहे. सरांच्या प्रस्तावनापर प्रतिक्रियेचा स्क्रीनशॉट येथे खाली सोबत दिला आहे. त्यासोबत अनुक्रमे डॉ. रणधीर शिंदे आणि डॉ. राजन गवस यांनी लिहीलेल्या या दोन्ही पुस्तकांच्या प्रस्तावनांचा संपादित अंशही त्यांनी सोबत दिला आहे. आपणही ते पुढील लिंकवर जरूर वाचू शकता-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा