शनिवार, १५ जानेवारी, २०२२

“इतिहास नावाची व्यक्ती”: श्रीधरपंत टिळक

 



लोकमान्य ही पदवी टिळक घराण्यातील कोणास शोभून दिसली असती तर ती श्रीधरपंतांसच होय. सख्ख्या भावापेक्षाही माझा त्यांच्याशी जिव्हाळा होता, असे उद्गार साक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढले ते श्रीधरपंत बळवंत टिळक यांच्याविषयी होय. श्रीधरपंत हे बाळ गंगाधर टिळक यांचे सुपुत्र. बाबासाहेबांच्या समाज समता संघाची शाखा पुण्यात उघडून तिचे कार्यालय थेट गायकवाड वाड्यात उघडणाऱ्या आणि तेथे चातुर्वर्ण्यविध्वंसक समाज समता संघ असा फलक लावणारे श्रीधरपंत हे पुत्र जरी टिळकांचे असले, तरी त्यांनी वारसा चालविला आगरकरांचा आणि मैत्र संपादले डॉ. आंबेडकरांचे! बाबासाहेबांवर आणि त्यांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्यावर त्यांची निरतिशय श्रद्धा होती. प्रबोधनकार ठाकरे, दिनकरराव जवळकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता आणि सार्वजनिक, सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. गायकवाड वाड्यातील गणपती उत्सवात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम त्यांनी घडवून आणला, ही त्या काळातील किती कृतीशील क्रांतीकारकता होती. केसरीमधील ट्रस्टींसमवेतच्या वादाला कंटाळून त्यांनी वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी (२५ मे १९२८) आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अवघे तीन तास आधी त्यांनी तसे बाबासाहेबांना पत्राद्वारे कळविले, यातूनच त्यांचे बाबासाहेबांवरील प्रेम दिसून येते.

श्रीधरपंतांच्या पुरोगामी कार्याचा वेध घेण्याची संधी बिग-एफएमचे #BIGFM सुप्रसिद्ध आरजे संग्राम #RJSANGRAM यांनी नुकतीच दिली. बिग एफएमने त्यांची पॉडकास्टिंग सेवाही सुरू केली आहे. त्यावर संग्राम इतिहास नावाची व्यक्ती नावाचा सेगमेंट करताहेत. या सेगमेंटमध्येच मला श्रीधरपंतांच्या कार्याच्या स्मृती जागविता आल्या. श्रीधरपंतांविषयी, त्यांच्या बाबासाहेबांशी असलेल्या जिव्हाळ्याविषयी आणि महत्त्वाचे म्हणजे अत्यंत अल्पायुष्यात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याविषयी जाणून घेण्यासाठी आपणही हे अवघ्या दहा मिनिटांचे पॉडकास्ट जरुर ऐकावे. याची लिंक अशी-

श्रीधर बळवंत टिळक यांच्याविषयी सांगताहेत डॉ. आलोक जत्राटकर

या पॉडकास्टसाठी पाठपुरावा करणारी आमची लाडकी कन्या सानिका #RJSANIKA आणि याच्या निर्मितीसाठी कष्ट घेणाऱ्या संग्राम यांना धन्यवाद द्यायलाच हवेत...


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा