![]() |
| शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात डॉ. आलोक जत्राटकर यांचा सत्कार करताना ज्येष्ठ पत्रकार वासुदेव कुलकर्णी. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, भाग्यश्री कासोटे-पाटील आणि कृष्णा दिवटे. |
"हमें तो अपनों ने सराहा, गैरों में कहाँ दम था,
हर कदम पे साथ उनका, बस यही तो पैगाम था।"
आपल्या एखाद्या अचिव्हमेंटबद्दल आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांकडून कौतुक होणं, यासारखं जगात अन्य समाधान नाही. आज हीच भावना माझ्या मनी होती, जेव्हा शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात माझे मित्र-मार्गदर्शक प्रा. रणधीर शिंदे आणि प्रा. नंदकुमार मोरे यांनी विशेष सत्कार घडवून आणला.
नुकतंच माझ्या 'ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे' या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद (शाखा ईश्वरपूर) यांचा लोकनेते राजारामबापू पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच, 'समाज आणि माध्यमं' या पुस्तकालाही वर्धा येथील प्रतिष्ठित मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचा उत्कृष्ट राज्यस्तरीय वैचारिक साहित्य पुरस्कार जाहीर झाला. या दोन्ही पुरस्कारांचे निमित्त या सत्कारामागे होते. महत्त्वाचे म्हणजे ज्येष्ठ पत्रकार-संपादक वासुदेव कुलकर्णी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाशक भाग्यश्री कासोटे-पाटील यांचाही 'लोकसत्ता तरुण तेजांकित' पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पुस्तकप्रेमी समूहाचे कृष्णा दिवटे यांची आपुलकीची उपस्थिती प्रेरक ठरली. मराठी विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचंही मला लाभणारं प्रेम खूपच मोलाचं आहे.
हा सत्कार स्वीकारत असताना या सुहृदांविषयी माझं हृदय केवळ अन् केवळ कृतज्ञभावानं ओथंबून वाहात आहे...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा